Homeकोपरगावतरुण पिढीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार आत्मसात करावेत -विवेकभैय्या कोल्हे

तरुण पिढीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार आत्मसात करावेत -विवेकभैय्या कोल्हे

धारणगाव,कुंभारी,कोळगाव थडी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

            भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत.जगातील सर्वोत्कृष्ट संविधान देऊन विविधतेने नटलेल्या या भारत देशाला अखंड ठेवणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्या सर्वांवर अनंत उपकार आहेत.डॉ.बाबासाहेबांचे विचार आजही समाजासाठी मार्गदर्शक असून,त्यांनी दिलेल्या संविधानातील तत्त्वानुसार वाटचाल केल्यास भारत जागतिक महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही.तरुण पिढीने उच्च शिक्षण घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार आत्मसात करणे आवश्यक आहे,असे आवाहन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.
    भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,महामानव,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त कोपरगाव तालुक्यातील धारणगाव,कुंभारी,कोळगाव थडी आदी ठिकाणी आयोजित कार्यक्रमात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.तसेच सर्वांना डॉ.आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

विवेकभैय्या कोल्हे म्हणाले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन-दलित,उपेक्षित,शोषितसमाजाच्या उद्धारासाठी फार मोठे कार्य केले आहे. त्यांनी देशातील अस्पृश्य,दलित, महिला,कामगार यांना माणूस म्हणून ओळख मिळावी तसेच त्यांचे मूलभूत अधिकार मिळावेत यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले.देशाच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा विचार पुढे नेण्याचे काम करत आहेत. केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून जन्मभूमी, चैत्यभूमी,दीक्षाभूमी,शिक्षणभूमी, दिल्ली नॅशनल मेमोरियल आदी पंचतीर्थ विकासासाठी विशेष काम सुरू आहे.


कुंभारी येथे आयोजित कार्यक्रमात युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी भगवान गौतम बुद्ध,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी विजय कदम,अशोक खळे,सुंदरराव कदम, सुनील कदम,सोपान चिने,सचिन चिने, राजेंद्र बढे,कचेश्वर माळी,भगवान खळे,उत्तम कदम,बाळासाहेब देवकर, जगन्नाथ भारती,विठ्ठल पवार,संजय कदम,रविराज भारती,दत्तू कदम, ज्ञानदेव कदम,सचिन कदम,मच्छिंद्र कदम आदींसह भाजप,भाजयुमोचे पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.धारणगाव येथे झालेल्या कार्यक्रमात युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी भगवान गौतम बुद्ध,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश दादा घोडेराव,माजी संचालक दगुराव चौधरी,भाजपचे तालुका सरचिटणीस दीपक चौधरी, सरपंच वरुणाताई दीपक चौधरी, उपसरपंच गणेश थोरात,नानासाहेब थोरात,संपतराव वहाडणे,लक्ष्मण चौधरी,दादासाहेब कदम,ग्रा.पं.सदस्य बाबासाहेब वाघ,संदीप थोरात,सुदर्शन कुहिटे,सुरज रणशूर,अण्णासाहेब रणशूर,दशरथ मोरे,पोलिस पाटील नीळकंठ रणशूर,ग्रामसेविका पूनम अहिरे,राजेंद्र वहाडणे,अरूण वहाडणे, जगन ननावरे,निलेश रणशूर,मिलिंद रणशूर आदींसह भाजप,भाजयुमोचे पदाधिकारी,कार्यकर्ते,ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
कोळगाव थडी येथे बौद्ध विहारमध्ये आयोजित कार्यक्रमात विवेकभैय्या कोल्हे यांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.माजी मंत्री सहकारमहर्षी स्व.शंकरराव कोल्हेसाहेब यांच्या हस्ते व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोळगाव थडी येथील बौद्ध विहारमध्ये २८ ऑक्टोबर २००४ रोजी तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिस्थापना करण्यात आली होती.त्या जुन्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला.याप्रसंगी श्यामराव मेहेरखांब, पुंजाजी राऊत,शिवाजी राजे, नानासाहेब पंडोरे,अनिल आंबेकर, पोपटराव निंबाळकर,भिकचंद लुटे, बाबासाहेब निंबाळकर,राजेंद्र मेहेरखांब,उत्तम मेहेरखांब,अनिल लुटे,बाळासाहेब वाकचौरे,बाळासाहेब निंबाळकर, अजिंक्य मेहेरखांब, धोंडीराम निंबाळकर,निलेश गायकवाड,नितीन निकाळे,रमेश निकाळे,अनिल मेहेरखांब,रतन मेहेरखांब,प्रमोद मेहेरखांब, मंदाताई गायकवाड,संगीताताई मेहेरखांब, प्रतिभाताई मेहेरखांब,उत्कर्षा मेहेरखांब,पूजाताई गायकवाड आदींसह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!