Homeकोपरगावबाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी डीजेच्या तालावर धरला ठेका

बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी डीजेच्या तालावर धरला ठेका

मुख्य संपादक /राजेंद्र तासकर

     भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती शुक्रवारी (१४ एप्रिल)कोपरगाव शहरात मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्यात आली.यानिमित्त सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तसेच सर्व समाजबांधवांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.रात्री शहरातून निघालेल्या मिरवणुकीत विवेकभैय्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरत नृत्य केले यावेळी तरुणांमध्ये मोठा उत्साह संचारला होता.
       विवेकभैय्या कोल्हे यांनी शहर व परिसरातील विविध भागात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.टिळकनगर येथील संविधान चौक फाऊंडेशन, भीमगर्जना तरुण मंडळ,लक्ष्मीनगर,खडकी आदी ठिकाणी जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.रात्री धारणगाव रोडवरून निघालेल्या मिरवणुकीत विवेकभैय्या कोल्हे यांच्यासह अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग (बाळासाहेब) संधान यांनी डीजेच्या तालावर उत्स्फूर्तपणे शानदार नृत्य करून मिरवणुकीत रंगत आणली.रिपाइं (आठवले गट) चे तालुकाध्यक्ष अनिल रणनवरे,रामदास कोपरे,सोमनाथ लोहकरे,फकिरा चंदनशिव,संदीप दुशिंग,अमोल थोरात,प्रकाश दुशिंग,संजय कोपरे,सागर कोपरे,संदीप कोपरे,विकास दुशिंग, पवन थोरात,सागर सोनवणे,वंचित बहुजन आघाडीचे शरद खरात यांनी विवेकभैय्या कोल्हे यांचा सत्कार केला. 
    याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले,कोपरगाव नगर परिषदेतील माजी गटनेते रवींद्र पाठक,माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,विजय आढाव,शिवसेना नेते कैलास जाधव, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, स्वप्नील निखाडे,माजी नगरसेवक बबलूशेठ वाणी,जनार्दन कदम,अशोकराव लकारे,बाळासाहेब आढाव,दिनेश कांबळे,हर्षाताई कांबळे,शिल्पाताई रोहमारे,वैभव गिरमे,संदीप देवकर,ताराबाई जपे,अनिता साळवे,दीपक जपे, भीम सरकार ग्रुपचे संस्थापक व माजी नगरसेवक जितेंद्र रणशूर,देवराम पगारे,भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, प्रदीप नवले,गोपीनाथ गायकवाड,प्रसाद आढाव,वैभव आढाव, रवींद्र रोहमारे,प्रमोद नरोडे,अल्ताफभाई कुरेशी,निखील शिंदे, विक्रांत सोनवणे,रोहित कनगरे,सिद्धांत सोनवणे,पिंकी चोपडा, शंकर बिऱ्हाडे,नितीन शिंदे,ॲड.गणेश मोकळ,गोपीनाथ सोनवणे,चंद्रकांत वाघमारे,संतोष नेरे,मुकुंद उदावंत,रंजन जाधव,पप्पू पडियार,सागर जाधव,राजेंद्र बागुल,सोमनाथ म्हस्के,अनिल गायकवाड,राहुल वाघ,रूपेश सिनगर,आतिश त्रिभुवन,राजू पगारे,रोहित राजगुरू,गौतम अहिरे,शिवा सलगर, अशोक नायकुंडे,शुभम घोडेराव,अक्षय जाधव,सुमित म्हस्के, जावेद शेख,आदित्य राजगुरू,गुड्डू सय्यद,गौतम पवार,गोरख देवडे,विजय गायकवाड,सुखदेव जाधव,रवींद्र धुळे,खालिकभाई कुरेशी,फकीर मोहम्मद पहिलवान,अल्ताफभाई पठाण,मुक्तारभाई पठाण,इलियास खाटीक,सचिन त्रिभुवन,मुन्नाभाई दरपेल,शफिक सय्यद,शाहरुख खान,शंकर महंकाळे,गौतम रणशूर,राहुल रणशूर,संतोष त्रिभुवन,सुरेश मरसाळे,दिलीप मरसाळे,मुकुल उबाळे,आकाशअंभोरे,निलेश डोके,पप्पू दिवेकर,संजय पवार, विजय चव्हाणके,सद्दामभाई सय्यद,समीर गवळी,सागर उबाळे, सतीश खरात,राहुल खरात,सचिन पवार,प्रतीक कुटे,संजय पवार,अजय किशोर,विजय बोर्डे,रमेश पवार,अमोल गणराज, नानासाहेब साळवे,खंडू वाघ,गौतम पवार,विशाल सोनवणे,रमेश भालेराव,विजय अंभोरे,सतीश साळवे,मायाताई दिवेकर, आशाताई साळवे,अनिताताई वाघ,वंदनाताई पवार,रोहित बडदे, अनिकेत रणशूर,शैलेश सातपुते,सिद्धार्थ गव्हाळे,वैभव रणशूर, रंजन त्रिभुवन,बबलू मरसाळे,आविष्कार रणशूर,अनिल पगारे, आकाश डोखे,कैलास सोनवणे,सागर पवार,गौतम उबाळे आदींसह भाजप,भाजयुमो,आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी,रिपाइं (आठवले गट) तसेच दलित व आंबेडकरी चळवळीतील नेते,कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!