Homeनाशिकसिन्नरएस.डी.जाधव इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव ;गणपती उत्सवानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन

एस.डी.जाधव इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव ;गणपती उत्सवानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव :सिन्नर तालुक्यातील शहा येथील एस.डी.जाधव इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दरवर्षी गणपती उत्सव मोठ्या भक्ती -भावाने उत्साहात साजरा केला जातो विविध कार्यक्रम आयोजित करून गणपती बाप्पांची आराधना केली जाते.
सालाबादप्रमाणे याही वर्षी शाळेमध्ये . गणपती बाप्पांचे मंगलमय वातावर्णात आगमन झाले.यानिमित्ताने २१सप्टेंबर २०२३ रोजी शाळेमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय संभाजी जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन केले.या स्पर्धेत एकूण 594 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.त्यासाठी विद्यार्थ्यांना वयोगटानुसार वेगवेगळे विषय देण्यात आलेले होते,जसे ; बाल गणेश,शाळेत जाणारा गणपती, अभ्यास करणारा गणपती,खेळणारा गणपती,गणपती बाप्पाची मिरवणूक अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक कला सादर करत या स्पर्धेचा आनंद घेतला.

या स्पर्धेतील प्रत्येक गटातून विद्यार्थ्यांचे गुणांकन करून क्रमांक काढले जातील व विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षीसही देण्यात येतील.

हि स्पर्धा यशस्वीतेसाठी चित्रकला विषय शिक्षक श्री संदीप शिंदे सर यांनी परीश्रम घेतले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा संपन्न करण्यात आली.विद्यार्थ्यांनी काढलेल्या या चित्रांचे पंचक्रोशीतील सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष सौ. शुभांगी जाधव मॅडम शाळेचे मुख्याध्यापक श्री. निळकंठ सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!