
मुख्य संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगाव :भारतीय संस्कृतीत संक्रांती निमित्त वाण देण्याची प्रथा आहे. याच संस्कृतीला जपत आपण एक आगळा वेगळ्या प्रकारे साजरा करू या.
गरजूं दिव्यांगांना कृत्रिम पाय,कॅलिपर व बॅटरी वर चालणारा कृत्रिम हाताचे प्रत्यारोपण करून संक्रांतीची अनोखी भेट देणार आहोत.
रोटरी क्लब ऑफ नासिक नॉर्थ,श्री श्याम सेवक मंडल ट्रस्ट व इनाली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय,कॅलिपर व बॅटरीवर चालणारा कृत्रिम हात प्रत्यारोपण या शिबिरात होणार आहे.
बॅटरी वर चालणाऱ्या कृत्रिम हाताचे शिबीर रविवार दि.14 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत बालाजी लॉन्स,गंगापूर रोड,नासिक येथे होणार आहे.
तसेच कृत्रिम हात,पाय व कॅलिपर चे सुरुवातीचे माप घेण्याचे शिबीर रविवार दि.21 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 ते सायं.5 या वेळेत, विश्वास टर्फ,सावरकर नगर,गंगापूर रोड,नाशिक आणि दि.22 ते 24 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 ते सायं.5 या वेळेत,नाथ सीता, येवलेकर कॉम्प्लेक्स,श्रद्धा मॉल च्या समोर, कॉलेज रोड,नाशिक येथे होणार आहे.
रविवार दि.26 जानेवारी 2024 रोजी कृत्रिम हात,पाय व कॅलिपर बसवून मिळतील.या साठी आपणास वेळ आणि ठिकाण कळवले जाईल.
आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी आपापल्या व्हाट्सएपच्या सर्व ग्रुप मध्ये सदर जाहिरात देऊन आम्हास सहकार्य करावे.सदर शिबिराचे स्वयंसेवक बनून सर्व जरूरतमंद लोकांना या शिबिरात येण्याचे आवाहन करून सेवा देण्याच्या पुण्य कर्मात आपला सहभाग नोंदवावा हिच सदिच्छा आयोजकांकडून करण्यात आली आहे.
धन्यवाद !