
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
सिन्नर प्रतिनिधी : – श्री कालभैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे एस डी जाधव इंग्लिश मीडियम स्कूल शहा या ग्रामीण भागातील उत्कृष्ट इंग्लिश मीडियम स्कूल म्हणून नावारूपाला आलेली संस्था,या संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष सन्माननीय श्री संभाजी सोपान जाधव यांचे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काळानुरूप गरजेनुसार इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे. तसेच या शाळेतून शिक्षणाबरोबरच अध्यात्म व सामाजिक कार्यक्रम देखील वेळोवेळी घेतले जातात.या शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तर होतोच पण त्याबरोबर प्रत्येक विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न होऊनच शाळेतून बाहेर पडतात हा वारसा शाळेने आजतागायत जपलेला आहे. सुमारे एक हजार विद्यार्थी चालू शैक्षणिक वर्षात शिक्षण घेत आहेत.

शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत मा.श्री. संभाजी जाधव सर यांचा लोकमतच्या वतीने यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे.
यावेळी सत्कारमुर्ती मा.श्री जाधव सर म्हणाले कि, मला मिळालेला सन्मान हा माझा नसून या शाळेसाठी कार्य करणाऱ्या सर्वांचाच आहे. या पुढेही असेच कार्य अधिक उत्साहाने आम्ही अविरत करत राहू तसेच ग्रामीण भागातील पालकांनी देखील शिक्षणाबद्दल जागरूक झाले पाहिजे असेही ते शेवटी म्हणाले.

यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.शुभांगी ताई जाधव मॅडम व शाळेचे प्राचार्य श्री अतुल निळकंठ सर यांच्या हस्ते शाळेच्या वतीने मा.श्री.जाधव सर यांचा शाल,श्रीफळ व पूप्प गुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री पारधी सर यांनी केले.