HomeUncategorizedमुर्तीची विटंबना करणारा कोण ? संतप्त ग्रामस्थांकडून रास्ता रोको

मुर्तीची विटंबना करणारा कोण ? संतप्त ग्रामस्थांकडून रास्ता रोको

मुख्य संपादक राजेंद्र तासकर

कोपरगाव : -राहाता तालुक्यातील पुणतांबा परिसरात काल मध्यरात्रीच्या सुमारास गोदावरी नदीकाठी असलेल्या श्री घृष्णेश्वर महादेव मंदिरामधील पिंड व नंदीच्या मुर्तीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली. हि घटना काल रविवार दि. २२ डिसेंबर रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून या घटनेचे पुणतांबा परिसरात तीव्र पडसाद उमटले आहे.

पुणतांबा गावात धार्मीक स्थळांची विटंबना करण्याची ही लागोपाठ दुसरी घटना घडलेली आहे. काल मध्यरात्री घडलेल्या घटनेची माहीती गावचे प्रथम नागरिक लोकनियुक्त सरंपच डॉ.धनंजय धनवटे यांना समजली असता त्यांनी तात्काळ शिर्डी पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांना दुरध्वनीवरून माहीती दिली.

या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन मोठया फौजफाटयासह पुणतांबा गावात दाखल झाले आणि श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर परीसराची पोलीस प्रशासनाने पहाणी करून घटनेचे गांभीर्य ओळखले असून ग्रामस्थांच्या मागणीनुसार अहिल्यानगर येथील श्वान पथकाला प्राचारण करण्यात आले.

पुणतांबा परिसरात धार्मीक स्थळांची विटंबना करण्याचे सत्र थांबत नसून मागील आठ ते दहा दिवसा पूर्वी पुणतांबा रेल्वे स्थानका शेजारी असलेल्या हनुमान मंदिराची देखील अशाच पध्दतीने एका माथेफिरु व्यक्तीने विटंबना केली होती. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी संबंधीत माथेफिरू व्यक्तीला अटक करण्यात आली. हे प्रकरण कुठं तरी शांत झालेलं असतांनाच अशाच एका घटनेची पुनवृत्ती काल मध्यरात्री घडलेली असून श्री घृष्णेश्वर महादेव मंदिरात पिंड व नंदीच्या मुर्तीची विटंबना झाली असल्याची माहिती समजलेली आहे. समस्त हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्यात. परंतु, या दोन्ही घटनेच्या मागे कोणत्या व्यक्तीचा हात असेल ही बाब अद्यापही समोर आलेली नाहीयेत.

या घटनेत पुणतांबा पंचक्रोशीत मोठया प्रमाणात धार्मिक वातावरण ढवळून निघालेलं आहे.परिसरामध्ये सद्या तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर आज दि. २३ डिसेंबर रोजी आशा केंद्र चौक या ठिकाणी निषेध सभा घेण्यात आली, यात हजारो ग्रामस्थ सहभागी झाले होते.पुढील तीन दिवसात घटनेचा छडा न लागल्यास उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणतांबा गावातील आठवडे बाजार व बाजारपेठ पूर्ण बंद ठेवण्यात आली आहेत. श्री घृष्णेश्वर महादेव मंदिरातील पिंड व नंदीची विटंबना करणारा अज्ञात व्यक्ती कोण ?पोलीस प्रशासनाने चौकशी सुरू केली असून घटनेतील अज्ञात व्यक्तीला लवकरात लवकर अटक करण्यात येणार असल्याचे आश्वासन पुणतांबा ग्रामस्थांना पोलीस प्रशासनाकडुन देण्यात आले . पोलीस प्रशासनाच्या आश्वासनानंतर आशा केंद्र चौक पुणतांबा येथील रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे. घडलेली ही घटना निंदणीय असून या घटनेची सखोल चौकशी करून त्या अज्ञात आरोपीला अटक करण्याची मागणी पुणतांबा ग्रामस्थांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!