
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : -क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती,बालिका दिनानिमित्त व वाचन संकल्पना महाराष्ट्राची उपक्रमांतर्गत शब्दगंध साहित्यिक परिषद कोपरगाव शाखेच्या वतीने स्व.र म परीख हिंदी मराठी ग्रंथालय वाचनालय येथे प्रतीमा पुजन करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी श्री क्षेत्र शिर्डी येथील गीतकार, गायक,संगितकार संजय येवले यांनी आपल्या सुरेल आवाजात स्व. लिखित स्वरबद्ध गीत सादर केले
स्वातीताई मुळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी श्वेता संजय येवले या विद्यार्थ्यांनीच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले याप्रसंगी ग्रंथपाल योगेश कोळगे,वृत्तपत्र छायाचित्रकार साहित्यिक हेमचंद्र भवर,नरोडे, खंडिझोड बाबा,सौ सरस्वती ताई येवले आदी उपस्थित होते.
शिर्डी येथील गीतकार दोन्ही डोळ्यांनी अंध (दिव्यांग) असून आजतागायत त्यांनी सहा हजार पस्तीस गाणी लिहिली आहेत तर काही चित्रपटांसाठी सुद्धा गाणी दिली आहेत. अजूनही काही गाणी स्वरबद्ध करण्याची बाकी आहेत.गीतकार कै. जगदीश खेबुडकर आणि काही मान्यवर गायकांसोबत संगीत देऊन गीत गायन केले आहे.


वाचन संकल्प महाराष्ट्राचा अभियान अंतर्गत डॉ दादासाहेब गलांडे लिखित व प्रा.डॉ बाबुराव उपाध्ये लिखित ग्रंथ भेट देऊन सन्मानित आले.
प्रमोद येवले यांनी आभारप्रदर्शन केले.