Homeराहुरीप्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने नगरपरिषदेला अपंग भवनसाठी निवेदन

प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने नगरपरिषदेला अपंग भवनसाठी निवेदन

संपादक – राजेंद्र तासकर
राज्यमंत्री मा.ना. श्री.ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडु साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार दिव्यांगाच्या वतीने देवळाली प्रवरा येथे दिव्यांग बांधवांना दिव्यांग भवनसाठी जागा उपलध करून त्याठिकाणी दिव्यांग भवन बांधून मिळावे यासाठी देवळाली प्रवरा नगरपरिषदचे मुख्याधिकारी मा.श्री.अजित निकत साहेब यांना निवेदन देण्यात आले.
देवळाली शहर लोकसंख्येने मोठे असून जवळपास 250पेक्षा जास्त दिव्यांग बांधव आहे. अनेक प्रकारात मोडणाऱ्या दिव्यांगांना विरंगुळा केंद्राची सोय होईल तसेच दिव्यांगांच्या बचतगटाच्या मीटिंग तसेच दिव्यांगांसाठी विचाराची देवाण – घेवाण करण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध होईल.असे मुख्याधिकारी अजित निकट साहेब यांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे, मुख्याधिकारी निकट साहेब यांनी मान्य केले असून दिव्यांग भवनासाठी जागा उपलब्ध करून देऊ व त्यासाठी निधी उपलब्ध करू असे सांगितले. त्याचबरोबर दिव्यांग सलीमभाई शेख याना वाढदिवसाच्या शुभेछा देत पुस्तक सन्मान केला, त्यावेळी ते बोलतांना म्हणाले कि,दिव्यांग बांधवांना शासनाच्या योजना, दिव्यांगांचे बचत गट स्थापन करावे असे आवाहन केले .
या वेळी प्रहार दिव्यांगचे तालुका अध्यक्ष मधुकर घाडगे, प्रहारचे जिल्हा समन्वयक आप्पासाहेबजी ढोकणे,राहुरी तालुका उपाध्यक्ष विठ्ठल पांडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब ढुस,प्रहार तालुका सल्लागार सलीम भाई शेख,तालुका सचिव योगेश लबडे,तालुका संपर्क प्रमुख रवींद्र भुजाडी,तालुका महिलाध्यक्षा सौ.रूपालीताई जाधव,तालुका उपाध्यक्षा सौ.छायाताई हारदे,राहुरी शहराध्यक्षा सौ.अनामिका हरेल, तालुका संघटक भास्कर दरंदरे, विजय कुमावत,देवळाली प्रवरा उपाध्यक्ष अनिल मोरे,मार्गदर्शक ह.भ.प.बाळकृष्ण खांदे महाराज, देवळाली प्रवरा सुखदेव कीर्तने, संदिप बोरसे,संघटक राजू धनवट, टाकळीमिया शाखाध्यक्ष ह.भ. प.नानासाहेब शिंदे,शाखा उपाध्यक्ष सुरेश दानवे,ब्राह्मणी शाखाध्यक्ष बाबुराव शिंदे सर, माहेगाव शाखाध्यक्ष भरत आढाव,कागळे मामा,गोटुबे आखाडा शाखाध्यक्ष दत्तात्रय खेमनर,वडनेर शाखाध्यक्ष दिपक हारदे असे अनेक पदाधिकारी व प्रहार दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांचे शेवटी सलीम शेख यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!