

भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेल तालुकाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते आणि दिव्यांग असतांना सर्वाधिक ४७ वेळा रक्तदान करणारे कोल्हे कुटूंबाचे निष्ठावंत कार्यकर्ते मुकुंदमामा काळे..
कोणाचाही वाढदिवस असतांना शाल,श्रीफल व पुष्पहार घालुन आवर्जून सत्कार करणार,सदैव हसतमुख आणि आनंदी असणारा हा माणूस.. आपल्यात काय कमी आहे यावर मात करून अनेकांच्या मनात जागा करणारे मुकुंदमामा..

जिद्द किती असावी तर तळेगाव मळे येथील शनी महाराजांच्या मंदिरात कितीही वादळ वारा पाऊस ऊन अडचण असो तरीही जायचे असे ठरवून निश्चय केला तो ३९० आठवडे होऊन देखील एकही खंड न होऊ देता सुरू आहे..

मा.श्री.बिपीनदादा शंकरराव कोल्हे साहेब,मा.सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे,युवानेते मा. श्री. विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे साहेब व

मा.सौ.रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगाची सेवा करण्याचे काम सातत्याने सुरू असणारे मुकुंदमामा…
मामा आपणांस दीर्घायुष्य व निरोगी जीवन लाभावे हीच शुभेच्छा..

सन्मा. मुकुंद मामा काळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
मुकुंदमामा आपल्या सर्वांतील ज्येष्ठ अनुभवसंपन्न व्यक्तीमत्व, मामा जनसामान्यांनाच्या समाजाच्या दिव्यांगाच्या न्याय हक्कांसाठी प्रत्येक घटकासाठी लढणारे लढवय्ये कार्यकर्ते, वेळप्रसंगी पदरमोड करुन विविध उपक्रम राबवणारे आपल्या सर्वांचे आदर्श आहेत. जेव्हा ऐनदुष्काळात कोपरगाव परिसरात दुष्काळ असताना स्वतःच्या शेतातील लाखो रुपयांचे उत्पन्न समोर असलेल्या ऊसाचे पाणी बंद करून स्वतःच्या विहिरीचे पाणी गावच्या ग्रामस्थांसाठी पिण्यासाठी उफलब्ध करुन देणारे खरे भगीरथ आहेत.. ४०-४२ हजार रुपये वार्षिक खर्च करुन १० मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणारे मुकुंद मामा आम्हाला ज्योतिबांसमानच वाटतात.. तुम्ही आमच्या अंतःकरणात अढळ स्थान निर्माण केले आहेत…तुमचा थोडा आदर्श घेऊनच आम्ही कार्यरत आहोत.
मामा पुनश्च एकदा आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
“डाॅ.श्री.मनोज भुजबळ “
मित्र परीवार कोपरगाव