HomeUncategorizedचासनळी येथील बालमृत्यु प्रकरणाचा तपास जलद गतीने व्हावा- डॉ.अशोक गावित्रे

चासनळी येथील बालमृत्यु प्रकरणाचा तपास जलद गतीने व्हावा- डॉ.अशोक गावित्रे

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : तालुक्यातील चासनळी येथील गोदावरी नदीपात्रात नुकताच एका चार ते पांच वर्ष वयाच्या मुलाचा मृतदेह पांढरे शुभ्र वस्रामध्ये गुंडाळून नदीपात्रात टाकून देण्यात आला होता स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड़किस आला.

पुलिस यंत्रणाने तपास करुन तो मृतदेह शवविच्छेदन करुन त्याच्या वडिलांच्या शोध घेवून ताब्यात देण्यात आला. सदर मृतदेहाचे शवविछेदन केले असून, हा मृत्यु कशामुळे झाला ? मृत्युचं नेमके कारण काय ? अंधश्रद्धा, अनैतिक सम्बद्धातुन की,अजुन काही?

मुलाची आई शीतल ज्ञानेश्वर बदादे व ती ज्याच्या सोबत राहत होती तो सागर शिवाजी वाघ दोन्ही संशयित फरार असून ते अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसून त्यामुळे मृत्यु कशामुळे झाला हे अजुन गुलदस्त्यात असून, मृतदेह नदीपात्रात का फेकून देण्यात आला हे प्रश्न अजुन अनुत्तरित असुन त्याचा तपास लवकरात लवकर करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता डॉ.अशोक गावित्रे यांनी लेखी स्वरुपात कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षण संदीप कोळी यांच्याकडे केली असून गुन्हेगारांना योग्य ते शासन करावे व सदर मुलाला न्याय द्यावा ही विनंती त्यांनी केली आहे.

सदर कुटुंब हे शिर्डी लगत कोऱ्हाळे येथे एक महिन्यापासून शेती काम करत होते व त्यांच्या शेत मालकाने माणुसकीच्या नात्यातून त्यांच्या सोबत असणारा मुलगा आजारी असल्याने त्याला शिर्डी येथील साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी घेवून आले असता तेथील डॉक्टरांनी सदर मुलाची तब्बेत खराब असून पुढील उपचार घेण्यासाठी लोणी येथे जाण्यास सांगितले. परंतु,सदर कुटुंबाने उपचार घेण्यास नकार दिला व तसेच घरी घेवून गेले काही दिवस त्याला घरी तसेच ठेवले. शेत मालकाना सकाळी सांगितले कि,आम्ही मुलाला घेवून आमच्या देवाला जावून येतो व तेथून ते निघुन गेले. मात्र,रात्री उशिरा परत कोऱ्हाळे येथे परतले,तेव्हां त्यांच्या सोबत मुलगा नव्हता.ही गोष्ट शेत मालकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मुलगा कुठे आहे अशी विचारणा केली असता तेव्हां मात्र,मालकास उड़वा उडवीची उत्तर देण्यास सुरुवात केली. मगं मात्र,मालकानी आधार कार्ड ची मागणी केली असता ते कुटुंब तेथुन फरार झाले.

या कामी पोलिस प्रशासनास या बाबतचे अनेक सी सी टी वी फुटेज मिळाले असून त्याआधारे तपास सुरु असून पोस्टमार्टम मध्ये देखील प्राथमिक अहवालात डोक्याला दुखापत व मेंदूत रक्तस्राव ही कारणे पुढे येत असून, घातपात की ?अजुन काही हे मुलाचे आई शितल ज्ञानेश्वर बदादे व सागर शिवाजी वाघ हे दोघे सापडल्यानंतरच कळेल. अगोदर देखिल या प्रकारणाचा अंधश्रद्धा चे दृष्टिकोनातून तपास व्हावा अशी मागणी झाली होती. या प्रकरणाच्या तपासास ग्रामीण पोलीस प्रशासनाकडून सामाजिक कार्यकर्ता डॉ.अशोक गावित्रे यांना हिरवा कंदिल मिळाला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!